क्राइम

बंगल्यावर नेऊन 15-20 जणांकडून जबर मारहाण; तरुणाचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप

coronavirus-lockdown-youth-beating-of-15-20-people-llegations-on-ncp-mla-jitendra-awhad.jpg | बंगल्यावर नेऊन 15-20 जणांकडून जबर मारहाण; तरुणाचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप या तरुणानं केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ‘5 एप्रिलच्या रात्री 11.50 च्या सुमारास दोन पोलीस साध्या वेशात माझ्या घरी आले. या पोलिसांनी ‘पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे, असं सांगून मला सोबत येण्यास सांगितलं. त्यानंतर या पोलिसांनी मला त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रॉपिओ गाडीने नेलं. यावेळी त्यांनी माझ्याकडील मोबाईल फोनही हिसकावून घेतला होता. त्यानंतर मला जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेलं. बंगल्यावर जितेंद्र आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15-20 जणांनी मला पोलिसांच्या फायबर काठीने पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केली, असा आरोप या तरुणाने केला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी आपल्याला रुग्णालयात दाखल केलं, असं या तरुणानं म्हटलंय. रुग्णालयातून सुटल्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशन गाठत या तरुणानं यासंदर्भात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.