Maharashtra

CoronaVirus | मुंबई कोरोनाचा दुसरा बळी, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर

Maharashtra-Coronavirus-Cases.jpg | CoronaVirus | मुंबई कोरोनाचा दुसरा बळी, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित या रुग्णाला 21 मार्चला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशभरातील मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 10 रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यातील चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कालपासून कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.