Maharashtra

Coronavirus देशात 236 कोरोना बाधित; महाराष्ट्रात एका दिवसात वाढले 11 रूग्ण;

Maharashtra-Coronavirus-Cases.jpg | Coronavirus देशात 236 कोरोना बाधित; महाराष्ट्रात एका दिवसात वाढले 11 रूग्ण; | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com

इटलीत एका दिवसात 627 लोकांचा बळी

जगभरात हैदोस घालणारा कोरोना व्हायरस सध्या भारतातही फोफावत आहे. भारतातील 20 राज्यांमध्ये कोरोना बाधित आढळून आले असून आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. Coronavirus देशामध्ये कोरोना व्हायरस फोफावत आहे. देशामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. भारतामध्ये आज आणखी 13 नवे रूग्ण आढळून आले आहेत. याचसोबत देशामध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 236 वर पोहोचली आहे. या लोकांमध्ये 191 भारतीय आणि 32 परदेशी लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून कोरोना बाधितांची संख्या सध्या 63 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
महाराष्ट्रात एका दिवसात वाढले 11 रूग्ण - एकूण 63 कोरोना बाधित;
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून कोरोना बाधितांची संख्या सध्या 63 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 10
मुंबई - 21
नागपूर- 4
यवतमाळ - 3
नवी मुंबई - 3
कल्याण - 3
अहमदनगर - 2
रायगड - 1
ठाणे - 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
#coronavirus इटलीत एका दिवसात 627 लोकांचा बळी
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन इटलीने 12 मार्चपासूनच लॉकडाऊन केले असून याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतीच असून बळी जाण्याचे प्रमाण थांबलेले नाही. 20 Maarch शुक्रवारी कोरोनाचे 5986 नवीन रुग्ण सापडले असून एकाच दिवशी 627 लोकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे इटलीत कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 4032 इतकी झाली आहे. तर 47,021 इतके नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 2,655 रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर आहे.
इटलीत मृतांचा आकडा वाढत असून तो चीनपेक्षाही अधिक झाला आहे. वृद्धांना या आजाराचं संक्रमण अधिक होत असून इटलीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचं सरासरी वय 80 इतकं आहे, तर संक्रमणाचं प्रमाण अधिक असणाऱ्या रुग्णांमध्ये सरासरी वय 63 इतकं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. खेरीज मधुमेह, फुफ्फुसांचे विकार किंवा अन्य तत्सम त्रासांमुळे कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचा हळुहळू फैलाव होत असताना इटलीचे प्रशासन सुस्त राहिले होते. मात्र बळींची संख्या वाढू लागताच स्थानिक आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. तोपर्यंत हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता या ठिकाणी मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे.
रविवारी भारतात 'जनता कर्फ्यु'
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.