Maharashtra

छत्रपती शिवरायांबद्दल Facebookवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्याला शिवप्रेमींनी चोपला अन्...

shivpremi-beaten-who-wrote-offensive-facebook-about-chhatrapati-shivaji-maharaj-20200320.jpg | छत्रपती शिवरायांबद्दल Facebookवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्याला शिवप्रेमींनी चोपला अन्... | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आणि विधानं करणाऱ्या इसमास शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला. शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब श्रेष्ठ होता असं विधान या इसमाकडून सातत्याने केलं जात होतं. इतकचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करण्यात येत होता.
फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या या इसमाचं नावं जितेंद्र राऊत असं आहे. अनेकदा फेसबुकवर राऊत याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या भाषेत शब्दप्रयोग केले होते. त्याच्या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रियेवरही जितेंद्र राऊत हा चिथावणीखोर विधान करत होता. शिवप्रेमींना अनेकदा जितेंद्र राऊतांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र राऊत याने लिखाण करणं सोडलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत खालच्या शब्दात जितेंद्र राऊत पोस्ट करत होता. महाराजांची बदनामी करणारे लिखाण केले जात होते. शिवप्रेमींनी अनेकदा त्याच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. अखेर आज शिवप्रेमींना जितेंद्र राऊताला पकडून चांगलाच चोप दिला. इतकचं नाही तर राऊत याच्या तोंडाला काळं फासून त्याची धिंड काढण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं.
शिवाजी महाराज यांना छत्रपती बोला पण औरगजेब आणि अफजलखानाचा आदर करा, तुम्ही तुमच्या शत्रूंचा सन्मान करत नसेल तर इतरांकडून सन्मानाची अपेक्षा बाळगू नका, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी करतो कारण हिंदुस्तानचे बादशाह आलमगीर यांना औरंग्या बोलता. शिवाजी महाराजांमुळे जातीयता घट्ट झाली. मराठा, ब्राह्मण, कायस्थ सोडून इतर दारिद्री झाले अशाप्रकारे अत्यंत खालच्या पातळीवरील भाष्य जितेंद्र राऊताने केलं होतं. या सर्वाचा परिणाम म्हणून संतप्त शिवप्रेमींना या इसमाला पकडून चोप दिला.