Maharashtra

Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 47 वर, मुंबईत आणखी दोन महिलांना लागण

Maharashtra-Coronavirus-Cases.jpg | Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 47 वर, मुंबईत आणखी दोन महिलांना लागण | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ?

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगर इथे कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुण्यात कोरोनाचे 19 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
युनायटेड किंग्डमवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, उल्हासनगर इथल्या 49 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला नुकतीच दुबईहून परतली आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पुणे - 8
पिंपरी चिंचवड - 11
मुंबई - 10
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड - 1
ठाणे - 1
अहमदनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी- 1
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 166 झाली आहे. तर कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे.
Maharashtra Health Ministry: A 22-yr-old woman tested positive for #COVID19 in Mumbai; has travel history to United Kingdom. One more person, a 49-year-old woman from Ulhasnagar tested positive today; has travel history to Dubai. Total no. of positive cases reaches 47 in state.
पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.