क्राइम

पिंपरीत टेम्पोत महिलेवर बलात्कार, रात्रभर फिरवून एक्सप्रेस वे सोडून दोघे पसार

Rape-Women-Girl.jpg | पिंपरीत टेम्पोत महिलेवर बलात्कार, रात्रभर फिरवून एक्सप्रेस वे सोडून दोघे पसार | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार झाला आहे. पतीसोबत भांडून उशीरा घराबाहेर पडलेल्या या महिलेला घरी सोडण्याचं आमिश दाखवून टेम्पो चालक आणि क्लीनरने हा बलात्कार केला आणि त्यानंतर महिलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोडून दिलं. आरोपी सध्या फरार आहेत.
आयशर टेम्पोत 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली टेम्पो चालक आणि क्लिनरने या पीडितेला शहरभर फिरवून एक्सप्रेस वेवर सोडलं.
याप्रकरणी आळंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरणे फाटा येथे सोडतो असं सांगून या नराधमांनी दहा फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजता दुचाकीवर बसवलं. तिथून पुढे जाऊन दुचाकी ठेवून आयशर टेम्पोत बसवलं आणि पुढे मोशी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, पुनावळे असं फिरवून एक्सप्रेस-वे वरील गहूंजे क्रिकेट स्टेडियम समोर पहाटे चार वाजता सोडलं आणि दोघे ही पसार झाले.
या दरम्यान एकाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. तिथून ही महिला शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. तेंव्हा ही धक्कादायक घटना समोर आली. शिरगाव पोलीस स्टेशनने झिरो नंबरने हा गुन्हा आळंदी पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे. पीडित महिला पती सोबत भांडण करून बाहेर पडली होती. नंतर ती घराकडे परतत असताना तिच्या सोबत हे दुष्कर्म घडलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील महिला अत्याचारांविषयीची आकडेवारी काही महिन्यापूर्वी समोर आली होती. डिसेंबर 2019 मध्ये आलेल्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड शहरात महिन्याला सरासरी 12 महिलांवर बलात्कार होत आहे. तर, 34 महिलांना विनयभंगासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.