Maharashtra

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, स्वस्त घरे;

maharashtra-budget-2020.jpg | Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, स्वस्त घरे; | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी शैक्षणिक विभाग, रोजगार, शेतकरी, उद्योग यासाठी निरनिराळ्या घोषणा केल्या.
तसंच स्थानिकांना रोजगार देण्यासाठीही त्यांनी मोठी घोषणा केली. स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुद्रांक शुल्कात सवलत
पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ : नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यासाठी 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसंच पुणे जागतिक महोत्सवासाठी 4 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.
आमदारांच्या विकासकांमांच्या निधीत वाढ : आमदारांच्या विकासकामांच्या निधीत वाढ करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. यापूर्वी आमदारांना 2 कोटी रूपयांचा निधी देण्यात येत होता. तो वाढवून 3 कोटी इतका करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
वरळीत पर्यटन संकुल उभारणार
मुंबईत मराठी भवन बांधणार
रोज 1 लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर 500 थाळी देणार. शिवभोजन थाळीसाठी 150 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
उच्च तंत्रशिक्षणासाठी 1300 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. बरोजगारांना रोजगारक्षम बनवणार. असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 10 वी उत्तीर्णांनाही रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
कर्जमाफीसाठी एकूण 22000 कोटी रुपयांचा निधी - पवार
क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा निधी
सर्व शाळांना इंटरनेटनं जोडणार
आरोग्य विभासाठी 5000 कोटी
1600 बसेस विकत घेणार