क्राइम

मुलीचा प्रियकर असल्याचा संशय, दहावीच्या विद्यार्थ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

crime_murder_1.jpg | मुलीचा प्रियकर असल्याचा संशय, दहावीच्या विद्यार्थ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
आपल्या मुलीच्या प्रेमात असल्याचा संशय असल्याने 17 वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी गोंदिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. फक्त संशय असल्याने मुलाची हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुलगा दहावीत शिकत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अतुल तरोणे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी सेवकराम याला अटक केली आहे. अतुल दहावीत शिकत होता. परीक्षा दिल्यानंतर तो पुन्हा घरी परतला होता. यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. यानंतर शेतात त्याचा मृतदेह आढळला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तपास केल्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सेवकराम याला अटक केली. चौकशी केली असता त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. 'आरोपीला अतुल आपल्या मुलीच्या प्रेमात असल्याचा संशय होता. याच संशयाखातर त्याने शेतात त्याला पकडलं आणि कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली,' असं पोलिसांनी सांगितलं आहे.