अपघात

सोलापुरात एसटी आणि जीपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

solapur-vairag-accident-five-people-dead-other-are-major-injured-20200221.jpg | सोलापुरात एसटी आणि जीपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
सोलापूर वैराग मार्गावरील राळेरास ते शेळगाव दरम्यान भीषण अपघात झाला आहे. क्रूझर जीप आणि एसटी बस या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. या अपघातात क्रूझर गाडीतील अन्य सहा जण गंभीर जखमी असून एसटी बसमधील 12 ते 14 जण किरकोळ जखमी झाले आहे.
सकाळी 9 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. क्युझर जीप क्रमांक - एम एच 13 सी एस 6231 ही गाडी बार्शी पंचायत समितीचे कर्मचारी बचत गटाचे अधिकारी घेऊन सोलापूरला निघाले होते. तर सोलापूर बार्शी एस टी बस नंबर एम एच 14 बी टी 3775 ही गाडी बार्शीकडे निघाली होती. या दोन्ही गाड्यात समोरासमोर भीषण धडक झाल्याने हा अपघात झाला. सोलापुरात उमेद अभियानाच्या वतीने रुक्मणी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये महिला बचत गटातर्फे तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आहे.
याच प्रदर्शनासाठी बचत गटाचे काही अधिकारी घेऊन पंचायत समितीचे कर्मचारी सोलापूरच्या दिशेला निघाले होते. या अपघातामध्ये छगन लिंबाजी काळे (वय 34, रा.पानगाव) , संदिप पांडूरंग घावटे (वय -23 , रा. पांढरी), देवनारायण महादेव काशीद (वय 44, रा. कव्हे) संभाजी जनार्दन महिंगडे (वय. 49 रा. बार्शी), राकेश अरुण मोहरे (वय 32, रा. बार्शी) यांचा मृत्यू झाला आहे. तर शुभांगी बांडवे (वय 35 रा. बार्शी), वर्षा रामचंद्र आखाडे (वय 35 रा. बार्शी), नीलकंठ उत्तरेश्वर कदम (वय 34 रा. पांगरी), कविता भगवान चव्हाण (वय 31, रा. अलीपुर), नरसिंह महादेव मांजरे (वय 55, रा. देगाव), रागिणी दिलीप मोरे (वय 29, रा. बार्शी) हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान या अपघातातील सर्व जखमींना तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.