अपघात

ताम्‍हीणी घाटात भीषण अपघात, पुण्याचे तिघे जागीच ठार

car-at-tamhini-ghat-accident-three-dead-on-the-spot-pune-202002.jpg | ताम्‍हीणी घाटात भीषण अपघात, पुण्याचे तिघे जागीच ठार | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
अलिबाग-पुणे येथे माणगाव महामार्गावर ताम्हीणी घाटात गुरूवारी पहाटेच्‍या सुमारास कारला झालेल्‍या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. निखील घुले , चंद्रकांत निकम व विक्रम सिंग अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सर्व मृत पुण्‍यातील रहिवासी आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समजतेय. या अपघातात विजय पाटील व सुनील तेलंग हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी त्यांना माणगाव उपजिल्‍हा रूग्‍णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्‍त कार पुण्‍याहून दिवेआगरच्‍या दिशेने निघाली होती. पहाटे पाच वाजण्‍याच्‍या सुमारास कार कोंडेसर गावाजवळ अवघड वळणावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्‍त्‍यालगतच्‍या झाडावर जावून आदळली व हा अपघात झाला . अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीसांनी घटनास्‍थळी धाव घेवून जखमींना रूग्‍णालयात हलवले. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.